कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rainfall

पुणे : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी सायंकाळी पुणे, रायगड, ठाणे, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात धुळे, पारोळा, अमळनेर, भुसावळ, दहीगाव, एरंडोल, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस झाला. कोकण, विदर्भात काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला.

गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. स्थानिक परिस्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या नाशिक जिल्ह्यात सायंकाळी जोरात पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिक येथे ११, मालेगाव येथे ५ आणि बुलढाणा येथे ११ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

रविवारी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ७ सप्टेंबरला कोकण, गोवा व विदर्भात तसेच ८ व ९ सप्टेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER