राज्यात १८ ते २१ अकाळी पावसाचा इशारा

Heavy rain.jpg

मुंबई :- गेल्या काही दिवसांत कडाक्याचा उन्हाळा (Summer) जाणवायला लागला होता तोच राज्यात काही ठिकाणी  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात १८ ते २१ मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज आहे.

या संभाव्य अकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्र येणार असल्याने होणाऱ्या आंतरक्रियेमुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली. यामुळे १८ ते २१ या तीन दिवसांत मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER