वॉर्नरच्या भावाचा सवाल, डेव्हिडला वगळले, मधल्या फळीचे काय?

Sport news-Maharashtra Today

सनरायझर्स हैदराबादने (SRH) डेव्हिड वॉर्नरकडून (David Warner) नेतृत्व काढून घेण्यासोबतच त्याला संघातही स्थान न देण्याच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेटप्रेमींना हा निर्णय रुचलेला नाही. वॉर्नरशिवाय एसआरएच म्हणजे कोहलीशिवाय आरसीबी, धोनीशिवाय सीएसके, रोहित शिवाय मुंबई इंडियन्स असे असल्याची भावना क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे. दुसारीकडे डेव्हिड वॉर्नरचा भाऊ स्टिव्ह (Steve Warner) यानेसुध्दा सनरायझर्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याने विचारणा केली आहे की डेव्हिडला वगळले पण तुमच्या फलंदाजीच्या मधल्या फळीबद्दल काय?

स्टिव्ह वॉर्नरने यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये डेव्हिडची उपयुक्तता मांडताना म्हटलेय की, ज्या गड्याने एवढी वर्षे तुमच्या संघाचा भार वाहिला त्या तुमच्या संघात सलामी फलंदाज ही समस्या नाहीच मुळी..! काही धावा तरी करू शकेल अशा मधल्या फळीबद्दल काय?

स्टिव्हने ही जी मते मांडली आहेत ती वस्तुस्थिती आहे कारण मधल्या फळीच्या तुलनेत सलामी फलंदाज म्हणून वाॕर्नर अपयशी ठरलेला नाही. पण त्याच्यासारखा आयपीएल विजेता कर्णधार सहकाऱ्यांसाठी मैदानात ड्रिंक्स घेऊन जाताना आणि सीमारेषेबाहेर बसलेला बघणे क्रिकेटपटूंना पटलेले नाही. डेव्हीड वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये 5447 धावा असून सफल फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

वाॕर्नरला खेळविणार नसल्याबाबत एसआरएचचे क्रिकेट आॕपरेशन्स डायरेक्टर टॉम मूडी म्हणाले की, वॉर्नरला वगळण्याचा निर्णय हा उत्तम कॉम्बिनेशनच्या दृष्टीने घेतला आहे.सद्यस्थितीत दोन परदेशी खेळाडूंमध्ये एक अष्टपैलू आणि रशिद खान याला खेळवणे योग्य वाटते.बेयरस्टो व विल्यम्सन फॉर्मात आहेत आणि त्यांचा खेळ पाहता आमच्यासमोर पर्याय नाही. म्हणून आम्हाला कठोर निर्णय घेणे भाग होते आणि कुणालातरी संघाबाहेर बसावेच लागणार होते. दुर्देवाने तौ खेळाडू डेव्हिड वॉर्नर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button