सनरायझर्सच्या सावध फलंदाजीवर कर्णधार वाॕर्नर नाराज

Warner unhappy with his batsmen

सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाने शनिवारी ज्या पध्दतीने अतिशय सावध फलंदाजी करत माफक धावसंख्या उभारुन नाईट रायडर्सविरुध्दचा (KKR) सामना गमावला त्यावर त्यांचा कर्णधार डेव्हिड वाॕर्नरने (David Warner)नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यात सनरायजर्सच्या फलंदाजांनी हाताशी विकेट असतानाही धावगती वाढवायचे प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे जी धावसंख्या 160च्या जवळपास असायला हवी होती तेथे त्यांच्या फक्त 4 बाद 142 धावाच झाल्या आणि टी-20 सामन्यात सव्वासातच्या सरासरीने धावा करणे फारसे कठीण नसतेच.त्यानुसारच नाईट रायडर्सने 18 षटकातंच हे लक्ष्य गाठलेआणि सहज सामना जिंकला.

या सामन्यात आपल्या फलंदाजांनी जेवढे चेंडू निर्धाव जाऊ दिले विशेषतः त्यावर वाॕर्नरने नाराजी व्यक्त केली. तो म्हणतो की टी-20 सामन्यांत एवढे चेंडू वाया जाऊ देणे परवडणारच नाही. इतर फलंदाज बेंचवर बसुन राहतील आणि मैदानातील दोघे 20 षटके खेळुन काढतील हे चालणार नाही.आम्ही अधिक प्रयत्न करायला हवे होते. मी बाद झाल्यावर चार ते पाच षटकात फक्त 20 धावा जमल्या असे वाॕर्नर म्हणाला. मधल्या षटकांमध्ये आम्ही चेंडू वारंवार सीमापार करायला हवा होता. मला वाटते आमच्या डावात 35 ते 36 डॉट बाॕल राहिले हे कसे चालेल?

वाॕर्नरने उल्लेख केला त्याकाळात मनिष पांडे व वृध्दिमान साहा हे खेळपट्टीवर होते. हे दोघे 10 व्या षटकापासून 18 व्या षटकापर्यंत खेळपट्टीवर होते.या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 62 धावा केल्या पण त्यासाठी त्यांनी 51 चेंडू घेतले आणि मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा व राशिद खानसारख्या फलंदाजांना संधीच मिळाली नाही. शर्मा व नबी यांना फक्त 11 चेंडूच खेळायला मिळाले.

साहाने 31 चेंडूत 30 धावा केल्या आणि टी-20 सामन्यात शंभरपेक्षा कमीचा स्ट्राईक रेट कधीच चांगला मानला जात नाही हे सत्य आहे.

सनरायजर्स फलंदाज एवढ्या संथगतीने आणि सावधपणे खेळत होते की,फलंदाजांना सक्तीने रिटायर्ड आऊट करण्याचा पर्याय आणावा का अशी चर्चा सुरु झाली होती. सनरायजर्स ही कमी धावसंख्यांचेही यशस्वीरित्या रक्षण करण्यासाठी प्रसिध्द असले तरी 142 ही धावसंख्या फारच कमी होती.160 च्या आसपास धावा केल्या असत्या तर कदाचित रंगत आली असती.

वाॕर्नरने ही नाराजी व्यक्त केली असली तरी फलंदाजांचा क्रम योग्यच होता असे त्याचे मत आहे. त्याच्यामते नबीसारख्या आक्रमक फलंदाजाला दहाव्या षटकातच फलंदाजीला पाठवणे फारच लवकर होते. अशावेळी तज्ञ फलंदाजच पाठवायला हवा.

एसआरएचचा दोन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे.त्यामुळे खेळाबद्दलच्या विचारपध्दतीत बदल करावा लागणार असल्याचे वाॕर्नरने म्हटले आहे. भारतातील मैदानांवरील सीमारेषेपेक्षा येथील सीमारेषा लांब असली तरी चेंडू सीमापार कसा जाईल हे बघायला हवे असे त्याने म्हटले आहे.

वाॕर्नरने इतरांवर नाराजी व्यक्त केली तसा स्वतःलाही दोष दिला आहे. सामन्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर आपण बाद व्हायला नको होते, थोडा संयम राखायची गरज होती असे म्हणत त्यानेया पराभवासाठी स्वतःलाच जबाबदार धरले आहे.

ही बातमी पण वाचा :  IPL २०२०: KXIP vs RR, राजस्थानवर भारी पडू शकते पंजाबचे आव्हान, Match Preview

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER