वॉर्नर आणि स्लेटर मालदीवमधील हॉटेलात खरोखरच भांडले का?

Warner and Slater involved in a brawl

कोरोना (Corona) आणि आयपीएलमुळे (IPL 2021) वादविवादांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा (Australian Cricketars) वाद पिच्छा सोडायला तयार नाही. ताज्या घटनेत मालदीव येथील हॉटेलात डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मायकेल स्लेटर (Michael Slater) यांच्यात भांडण झाल्याची बातमी वेगाने पसरली आहे; पण या दोघांनी त्याचा इन्कार करताना असे काहीच घडले नसल्याचे म्हटले आहे. आयपीएलमध्येच स्थगित झाल्याने आणि ऑस्ट्रेलियाने भारतातून परतणाऱ्यांना आपल्या सीमा १५ मेपर्यंत बंद केलेल्या असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक, समालोचक आणि इतर असे ३९ जण भारतात अडकून पडले होते.

त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारीच एका खासगी विमानाने मालदीवमध्ये पोहचवले आहे. त्या मालदीवची राजधानी माले येथील एका हॉटेलातील बारमध्ये मद्यपान केल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर यांच्यात भांडण झाल्याचे वृत्त आहे; पण या दोघांनीही असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. ‘डेली टेलिग्राफ’ या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार ताज कोरल रिसोर्ट – जिथे हे खेळाडू क्वारंटाईन आहेत – तिथे रात्री उशिरा वॉर्नर व स्लेटर यांच्यात वादानंतर धक्काबुक्की झाली. ‘या सर्व अफवा आहेत. असे काहीच घडले नाही.

डेव्ही आणि मी चांगले मित्र आहोत आणि आमच्यात भांडण होण्याचा प्रश्नच येत नाही’ असे स्लेटरने म्हटले आहे. वॉर्नरने म्हटलेय की, लोकांना अशा बातम्या कुठून मिळतात कळत नाही. तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी असल्याशिवाय किंवा ठोस पुरावे असल्याशिवाय असे काही लिहायलाच नको. असे काहीच घडलेले नाही. त्याआधी स्लेटर हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर तीव्र शब्दांत आगपाखड केल्याने चर्चेत आला होता तर डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्सच्या संघात मनीष पांडेला स्थान न मिळाल्याबद्दल जाहीर वक्तव्य केल्यानंतर कर्णधारपद आणि पुढे सनरायझर्सच्या संघातील स्थानही गमावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button