इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केल्यास रस्त्यावर उतरू; वारकरी संप्रदायाचा इशारा

पंढरपूर : इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ वारकरी संप्रदाय पुढे सरसावला आहे. राज्य सरकारने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केल्यास, वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल, असा इशारा आज सोमवारी देण्यात आला. पंढरपूरमध्ये आज जेष्ठ कीर्तनकारांची बैठक झाली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती कीर्तनकार प्रभाकरदादा बोधले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. इंदोरीकर महाराजांच्या सम व विषमतिथी वक्तव्यामुळे अंनिसने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, हे येथे उल्लेखनीय.

चीनच्याच सरकारी प्रयोगशाळेतून पसरला ‘कोरोना’ विषाणू ?