औरंगाबाद : वॉर्ड रचनेत हद्दीसह जात आरक्षणात होणार बदल

Aurangabad municipal

औरंगाबाद : मनपाच्या निवडणूकीत पूर्ण वॉर्ड रचना बदलण्यात येणार आहे. त्याचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांच्या त्रिस्तरीय समितीला देण्यात आला. सोमवारी निवडणूक आयोगांकडे पाठवण्यात येणाऱ्या या आराखड्यात वॉर्डांच्या हद्दीसह आरक्षणही बदलणार आहे.

मनपाची निवडणूक यंदाही वॉर्ड पध्दतीनेच होणार आहे. त्यानुसार पुन्हा नव्याने तीन दिवसांत नवीन प्रभाग रचना तयार करून एक वॉर्ड एक नगरसेवक पध्दतीने प्रारूप आराखडा तयार केला. तो १३ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. त्यासाठी आवश्यक माहिती त्रिसदस्यीत समितीने घेतली आहे. गुगल मॅपसह वॉर्डांच्या बदलण्यात आलेल्या हद्दींची माहिती घेऊन त्यावर शेवटचा हात फिरवला. आराखडा प्रसिध्दीनंतर आठ दिवसांत सूचना, हरकती, दावे घेण्यासह जातीनिहाय आरक्षणाचे आदेश करणार आहेत. त्यानुसार मनपाने तयारी केली आहे.