परभणी : प्रभाग क्र.14 अ पोट निवडणूक- काँग्रेसच्या सौ.शहेनाजबी अकबर खान मोठया मताधिक्याने विजयी

Congress Flags

पूर्णा : राज्यात महाआघाडीची युती असतांना परभणी महानगर पालिकेत मात्र काँग्रेसने ही महाआघाडी युती मोडीत काढत राष्ट्रवादी व शिवसेनेच्याच विरोधात दंड थोपटून आपला उमेदवार उभा केला. काँग्रेसच्या सौ. शहेनाजबी खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद महेबुब अली यांचा तब्बल 1928 मतांनी पराभव केला. परभणी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस ने राष्ट्रवादी, शिवसेनेचे उमेदवार पराभूत केले.

शहर महानगर पालीकेच्या प्रभाग क्र. 14 अ साठी पोटनिव्डणूक घेण्यात आली. त्यात सकाळी 10 वा. निर्वाचण अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे,सहा. निर्वाचन अधिकारी तहसीलदार विद्याचरण कडवकर, सहा.नि.अ.जायभाये,तसेच किरण फुटाणे, नगरसचिव विकास रत्नपारखे,अदनान कादरी,राजाभाऊ मोरे,मुताहेर खान, सहा.आयुक्त मुसद्दीक खान,शिवाजी सरनाईक ,अल्केश देशमुख आदीं मतमोजणीसाठी उपस्थित होते.

देगलूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात संगणक चालकाने केला साडेनऊ लाखाचा अपहार

सदरील मतमोजणी चार फे-यात करण्यात आली. या निवडणूकीत सौ. खान शहनाज बी अकबर खान (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस)यांना एकूण 4279 तर सय्यद महेबुब अली स. अहेमद अली (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी) यांना 2351 मते पडली तर बेगम शबाना अलीमोद्दीन (अपक्ष)यांना केवळ 40 व खटके सतीश भाऊराव (शिवसेना) यांना 709 मते पडली. स.आबेद स. उस्मान (अपक्ष) यांना 48 मते मिळाली.

एकूण वैध मते 7495 ,नोटासाठी मतदान 68, या मतमोजणी प्रकियेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय,महानगर पालिका,औद्योगीक प्रशिक्षण संस्था, स्वच्छता कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले. या निवडणूकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खान शहनाज बी अकबर खान यांचे अभिनंदन आ.सुरेशराव वरपूडकर, मा.आ. सुरेशराव देशमुख, मा.खा. तुकाराम रेंगे, महापौर सौ.अनिताताई सोनकांबळे,उप महापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला, सुनिल देशमुख, रविंद्र सोनकांबळे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, ता.अध्यक्ष पंजाब देशमुख,अब्दुल हफीज चाऊस, सभापती गुलमीर खान,इरफानुर रहेमान आदींनी केले.