मनसेत यायचे आहे? आताच या – राज ठाकरे

Raj Thackeray

पुणेः ”ज्यांना कोणाला पक्षात यायचे आहे, त्यांना आताच दार उघडे आहेत, निवडणुकीच्या तोंडावर नाही”, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणालेत.

पुणे आणि पिंपरी महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली होती, त्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केले. सध्या मनसेत कार्यकर्ते मोठ्या संख्येत येत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार

या दौऱ्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या १४ जणांच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली. ही बैठक सुमारे २ तास चालली. राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात अहवाल देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना ‘एकला चलो रे’चा संदेश देत कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घुमला ‘एकला चलो रे’चा नारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER