‘गर्लफ्रेंडला भेटायला जायचे आहे!’ विनंती करणाऱ्याला सोनू सूदचा सल्ला …खऱ्या प्रेमाची परीक्षा होईल

Sonu Sood

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक दुसऱ्या राज्यात अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी राज्य सरकारांसोबत अनेक लोकही व्यक्तिगत पातळीवर मदत करत आहेत. अभिनेता सोनू सूदही या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी मदत करतो आहे. कोणाला अडचण असेल तर त्याने माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन त्याने केले होते. याचा फायदा घेऊन एकाने सूदला विनंती केली की – प्रेयसीला भेटण्यासाठी बिहारला जायचे आहे, मदत करा.

त्या प्रेमवीराच्या विनंतीला सूदने मनोरंजक उत्तर दिले. म्हणाला – “थोडे दिवस तिच्यापासून दूर राहा. खऱ्या प्रेमाची परीक्षा होईल.” सोनू सूदचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन आपल्या राज्यात परत जाणाऱ्यांसाठी गाड्यांची सोय केली. या गाड्यांचा खर्च सूद स्वतः करतो आहे. “शेवटचा मजूर त्याच्या घरी पोहचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असे त्याने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सोनूने १ हजार ५०० पीपीई किट्सची मदत केली होती. त्याचे हॉटेल कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करून दिले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER