वंजारी युवक संघटनेने एमपीएससी कार्यालयातील अधिकाऱ्यांना फासले काळे

मुंबई :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून काढण्यात आलेल्या पीएसआयच्या जाहिरातीत धनगर समाजाला अवघ्या 2 जागा तर वंजारी समाजासाठी जागाच न दिल्याने वंजारी आणि धनगर समाजाने एमपीएससीविरोधात आक्रमक पवित्रा पुकारला आहे. वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी MPSC कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलन केले. तसेच, त्यांनी कार्यालयात अंडी फेकली आणि अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. वंजारी समाजाच्या आरक्षित जागा भराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

MPSCने PSIच्या 650 जागांच्या जाहिरातीमध्ये धनगर आणि वंजारी समाजासाठी जागाच दिल्या नाहीत. या जाहिरातीमध्ये आरक्षित कोट्यानुसार धनगर समाजाला 24 जागा मिळणे अपेक्षित आहे. मात्र या जाहिरातीनुसार धनगर समाजाला अवघ्या 2 जागा आणि वंजारी समाजाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. त्यामुळे धनगर, वंजारी समाजावर पुन्हा अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.