चंद्रभागा नदीवरील घाटाची भिंत कोसळली; सहा जणांचा मृत्यू

wall-collapsed-at-chandrabhaga

पंढरपूर :  मागील चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्यामुळे पंढरपुरात पूर आला. त्यातच चंद्रभागा नदीतीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. या घटनेत सहा जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाऊस सुरू असल्याने या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे होते.

यामुळे मोठ्या संख्येने लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खासकरून काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला होते. भिंत कोसळताच लोकांनी आक्रोश केला. ढिगाऱ्याखाली किती लोक दबले गेले याची चिंता असून मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर हे जेसीबी व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER