जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो!, आशिष शेलारांचा सरकारला पुन्हा टोला

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) संकटकाळात सर्वच सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात मात्र मूर्तीकारांवर उपासमारीची पाळी आली होती. राज्य सरकारने अनेक नियम लादत गणेश मूर्तींच्या उंची निश्चित केल्या होत्या. परंतु आता नवरात्रीला अवघे काही दिवस उरले असताना राज्य सरकारतर्फे कुठलीही नियमावली जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

नवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहेत. राज्य सरकारला विनंती करुनही अद्याप देवीच्या मुर्तीची उंची आणि उत्सवाच्या नियमावली बाबत सरकार काहीच निर्णय घेत नसल्याने राज्यातील हजारो मुर्तीकार चिंतेत आहेत. अशाच विलंबाचा फटका गणेश मुर्तीकारांना बसला होता.

जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो!!, असे आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER