थकबाकी भरल्यास शेतकऱ्यांना वीजबिलात ५० टक्के माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

Uddhav Thackeray

मुंबई : कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकर्‍यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आजच्या बैठकीत ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता ६६ टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. ४० हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांची मागील ५ वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.

२०१८ नंतर कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येत नव्हते. आता नव्या धोरणानुसार कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येणार आहे. शेतकर्‍यांकडे ४० हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला. मागील पाच वर्षांतील डिले चार्जेस रद्द केले जाणार आहे. तसेच थकबाकीची रक्कम भरली तर शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी लाख भर शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी अर्ज करतात त्यामुळे आता २ लाखांच्या वर कृषी कनेक्शन द्यायचे आहेत ते दिले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER