…आणि शिवसेना नगरसेवकाने ऍम्बुलन्समध्ये येवून बजावला मतदानाचा हक्‍क

Shivsena

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुला विजयासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ असले तरी मोठी खबरदारी घेण्यात आली होती. इगतपुरीहून रविवारी शहरात दाखल झालेले सदस्य सोमवारी सकाळी एकत्रित मतदान केंद्रावर पोचले आणि मतदानाचा हक्‍क बजावला. तर डेंग्यूने आजारी असलेले शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी ऍम्बुलन्समध्ये येवून आपला मतदानाचा हक्‍क बजावला.

ही बातमी पण वाचा : औरंगाबादच्या निवडणुकीवर उद्धव ठाकरेंचा वॉच

मतदानाच्या दिवशी औरंगाबाद तालुक्‍यातील सदस्य सकाळी साडेसातच्या सुमारास सर्व सदस्य एकत्रितपणे तर शहरी भागातील सदस्य थोडे उशिरा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात दाखल झाले आणि मतदानाचा हक्‍क बजावला. आमदार संजय शिरसाट यांचे पूत्र व नगरसेवक सिद्धांत शिरसाट हे मागील तीन दिवसांपासून डेंग्यूच्या उपचारासाठी एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल आहेत. सोमवारी मतदानासाठी ते ऍम्बुलन्समधून तहसील कार्यालयात मतदान करण्यासाठी आले होते. प्रकृती ठीक नसतानादेखील महायुतीचे संख्याबळ कमी व्हायला नको म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावला.

ही बातमी पण वाचा : एमआयएमने केली शिवसेनेची मदत ; अंबादास दानवेंच्या विजयाचा मार्ग सुकर?