उद्या आसाम-बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान

BJP-Congress

पुद्दुचेरी : केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील निवडणूक प्रचार रविवारी संपला आहे. तर केरळ, आसाममध्ये ६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या तीन राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूत यंदा भाजपने अण्णा द्रमुकशी आघाडी युती केली आहे. या निवडणुकीत भाजपने तमिळ संस्कृती आणि गौरवशाली इतिहासावर जोर दिला आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री जयललिता आणि एम. करुणानिधी यांचे निधन झाल्याने तमिळ जनतेला या दोन्ही नेत्यांची निवडणुकीत कमतरता जाणवत आहे. अभिनेते कमल हसन यांनी पक्ष या निवडणुकीत उतरवला आहे. त्यांनीही प्रचारात जोर धरला होता. कमल हसन हे कोयम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत.

हॅट्रीक की परिवर्तन

आसाममध्ये प्रचाराचा पारा चांगलाच चढला होता. गांधी कुटुंबाने पश्चिम बंगालपेक्षा आसाममध्ये जास्तच लक्ष दिले होते. त्यामुळे बंगालची निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आसामच्या रणसंग्रामात एकूण ३३७ उमेदवार उभे आहेत. उद्या ६ एप्रिल रोजी आसाम आणि तामिळनाडूत मतदान होत आहे. त्यामुळे अण्णाद्रमुक उद्या हॅट्रीक साधणार की राज्यात सत्तांतर होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बंगालमध्ये काय होणार?

पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होत आहे. बंगालमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी ३१ जागांवर मतदान होणार आहे. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही प्रचाराचे रान उठवून दिले. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकट्याच प्रचार करत आहेत. तिसऱ्या टप्प्यानंतर अभिनेत्री जया बच्चन बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे बंगालमध्ये काय होणार याचीही उत्सुकता सर्वांना आहे.

पुद्दुचेरी कोणाची?

पुद्दुचेरीत ६ एप्रिल रोजी एका टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एआयएडीएमकेला ४, एआयएनआरसीला ८, डीएमकेला २ आणि इतरला १ जागा मिळाली होती. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमध्ये युती आहे. तर एआयएडीएमके आणि एआयएनआरसी विरोधी पक्ष आहेत. पुद्दुचेरीत आता ३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. पुद्दुचेरी हे एक केंद्र शासित राज्य आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस २१ जागांवर लढून १५ जागा जिंकल्या होत्या. ऑल इंडिया एनआर काँग्रेसने ३० जागांवर निवडणूक लढून फक्त ८ जागा जिंकल्या होत्या. इथे बहुमतासाठी १६ जागा पाहीजे.

केरळकडे लक्ष

केरळमध्येही ६ एप्रिल रोजी एका टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहे. केरळात विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी ७१ आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. २०१६च्या निवडणुकीत एलडीएफने ८३ जागांवर विजय मिळवला होता, तर यूडीएफने ४७ जागा जिंकल्या होत्या. ९८ जागांपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे पुन्हा एलडीएफ येणार की यूडीएफ बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button