येत्या ३० मार्चला धुळे-नंदूरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान

Vidhan Bhavan

धुळे :- महाराष्ट्रातील धुळे-नंदूरबार विधान परिषदेची पोटनिवडणूक येत्या ३० मार्च रोजी होत असल्याचे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अमरीशभाई रसिकलाल पटेल यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे.

या निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. अधिसूचना जारी करण्याची तारीख गुरुवार ५ मार्च २०२०. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार १२ मार्च. अर्जाची छाननी शुक्रवार १३ मार्च. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार १६ मार्च.

मतदान सोमवार ३० मार्च २०२० रोजी होणार असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ ही आहे. मतमोजणी मंगळवार ३१ मार्चला. बुधवार १ ऑगस्ट २०२० पर्यंत निवडणूक पूर्ण होणार आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात येईल.