मतदार कोणत्याही पक्षाचा गुलाम नाही : ओवेसी

asaduddin owaisi

हैदराबाद :- बिहारचा मतदार कोणाचाही गुलाम नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आभार. मतदार आमचा गुलाम आहे आणि आम्ही त्याचा हवा तसा वापर करू, असे समजण्याचे दिवस आता गेले. तुम्हाला काम करावे लागेल आणि लोकांची मनेही जिंकावी लागेल, असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी म्हणालेत.

बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने पाच जागांवर विजय मिळवला. यानंतर बिहारची जनता कोणाची गुलाम नाही. आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार करू, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओवेसी म्हणालेत.

ते म्हणाले – पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती. पाच जागांचं आमचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. सर्व जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खूप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिलं. जनतेने आम्हाला मतदान केलं. आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत. आमच्या अनेक नेत्यांना खोट्या आरोपाखाली टीएमसीनं तुरुंगात टाकलं आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुका आम्ही लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू.

ते दिवस गेले…

बिहारमध्ये आम्ही आरजेडीच्या लोकांशी बोलणी केली होती. आम्ही प्रयत्न केले होते. परंतु त्यांनी मान्य केलं नाही. बिहारचा मतदार हा कोणाचा गुलाम नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केले  त्यांचे आभार. मतदार आमचा गुलाम आहे आणि आम्ही त्याचा हवा तसा वापर करू, असं  जो पक्ष समजतो ते दिवस आता गेले. तुम्हाला काम करावे  लागेल आणि लोकांची  मनेही जिंकावी लागेल, असे ओवेसी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : तेजस्वी भविष्यात बिहारचे नेतृत्व करू शकतात – उमा भरती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER