अपक्ष उमेदवाराला मत द्या, शिवसेना नेत्याच्या ‘क्लिप’मुळे महाविकास आघाडीत खळबळ

Narendra Patil

बीड : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीला दोन दिवस शिल्लक असताना शिवसेनेचे नेते माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांची अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना मत द्या, असे आवाहन करणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

रमेश पोकळे हे मराठवाडा पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार आहेत. येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) आहेत. यामुळे महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

क्लिपमध्ये नरेंद्र पाटील म्हणतात – मराठवाड्यातील उमेदवार रमेश पोकळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून अनेक लोकांची कर्ज प्रकरणे करून दिली आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी रमेश पोकळे या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER