व्लादिमीर पुतीन यांना गंभीर आजार; लवकरच राष्ट्रपतिपद सोडण्याची शक्यता

Vladimir Putin

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) पुढील वर्षी जानेवारीत राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुतीन पार्किंसन्स आजाराने ग्रासलेले आहेत. त्यामुळेच ते राष्ट्राध्यक्षपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मॉस्कोमधील राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवेई यांनी ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’ला सांगितले की, रशियन राष्ट्रपतींची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली पुतीन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. पुतीन यांचे कुटुंब असून, कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे पुतीन हे जानेवारी महिन्यात सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात. रशियन राष्ट्रपती पार्किसन्सने ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २०२६ पर्यंत पदावर कायम राखण्याची घटनादुरुस्ती करून घेतली होती. रशियावर दोन दशकांपासून शासन करणा-या ६७ वर्षीय पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येणार आहे; परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रशियामध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER