विवेक ओबेरॉय लाँच करतोय श्वेता तिवारीच्या मुलीला

बॉलिवू़डमध्ये (Bollywood) नेपोटिझमवर चर्चा सुरु असतानाच आता विवेक ओबेरॉही (Vivek Oberoi) या वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहे. विवेक ओबेरॉय रोझी- द सॅफ्रन चॅप्टर (Rosie- The Saffron Chapter) नावाचा एक रहस्यमय चित्रपट बनवत असून यात नायिका म्हणून पलक तिवारीला (Palak Tiwari) लाँच करीत आहे. पलक ही छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.

विवेकचा हा नवा चित्रपट 17 वर्षांपूर्वी गुरुग्रामच्या एका कॉल सेंटरमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. विवेकने चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि पलकच्या नावाची घोषणा केल्याबरोबर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात कमेंट्स येऊ लागल्या आहेत. विवेकही नेपोटिझमला वाव देत आहे असे म्हटले जाऊ लागले आहे. विवेक ओबेरॉयने मात्र या आरोपांचा इंकार करीत चित्रपटातील व्यक्तिरेखेला सूट असल्यानेच पलकची निवड केल्याचचे स्पष्टीकरण दिले आहे.

या चित्रपटाची कथा अत्यंत रंजक आहे. गुरुग्राममधील एका कॉल सेंटरमध्ये एक मुलगी काम करीत असते. आठ वर्षे ती काम करते. त्यानंतर ती गायब होते. चौकशी केल्यानंतर समजते की त्या मुलीचा खूप आधीच मृत्यू झालेला असतो. मग कामावर येणारी ती मुलगी कोण आणि ती का असे करते याचा उलगडा या चित्रपटात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वास्तवात मात्र त्या मुलीचा शोध लागलेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER