पुरुषांना ‘हे’ शुभ संकेत देतील विवाह करण्याची अनुमती

wedding

आजकाल कोणतेही पुरुष किंवा स्त्री हे सिंगल राहणंच पसंत करतात. विशेषतः पुरुषांना तर कोणतेही जबाबदारी नको असते. परंतु आयुष्यात एकदा स्थिरता, जबाबदारी आली कि मघ ते ही इतरांप्रमाणे आपल्या पारिवारीक आयुष्या बद्दल, लग्नाबद्दल विचार करू लागतात. पण नेमक काय करावे, कधी करावे यामध्ये कन्फ्युज होतात. तुम्हाल ही असच होत आहे?? तर मघ या संकेतावरून ओळखा तुमच्या लग्नाची योग्य वेळ.

  • तुम्ही आपल्या आयुष्यात खूप आनंदी क्षण जगला असाल. याबद्दल तुम्हाला कोणता खेदही नसेल पण आता तुम्ही स्थिरतेच्या शोधात असाल ?  कोणता आधार शोधत असाल ? तर सिंगलपासून मिंगल होण्याची ही योग्य वेळ असल्याचं समजावं. याबाबत तुम्ही गंभीर असाल तर लग्न करायला हवं.

विवाह

ही बातमी पण वाचा : चित्ती असु द्यावे समाधान…..

  • सिंगल असताना आपण सारी कमाई खर्च करुन टाकतो. आपण बऱ्याचदा वर्तमानात जगत असतो. पण अशी एक वेळ येते जेव्हा आपण बचतीबद्दल विचार करतो, घर घेण्याबद्दल विचार करतो. ही लग्नाची योग्य वेळ असू शकते.

  • सिंगल लाईफमधून बोअर होणं हा मानवी स्वभाव आहे. आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी कोणासोबत तरी शेअर कराव्या असं अनेकांना वाटतं. कधीतरी आपण खऱ्या प्रेमात पडतो. टीन एज संपल्यानंतर २४ ते २८ वर्षाचे असताना तुम्ही कोणावर प्रेम करत आहात आणि समोरची व्यक्तीही तुमच्यावर तेवढंच प्रेम करत असेल तर ही लग्नाची योग्य वेळ आहे.

ही बातमी पण वाचा : महिलांना सन्मान देण्यासाठी मुलांवर करा अशे संस्कार…

  • बऱ्याच जणांना आपल्या पार्टनरच्या फ्रेंड सर्कलसोबत फिरायला संकोच वाटतो. पण लग्नापर्यंत मनं जुळली असतील तर आपल्याला पार्टनरच्या फ्रेंडसोबतही कंफर्ट वाटू लागतं. आपल्याला कपल लाईफ बद्दल खूप काही जाणून घ्यायचं असतं म्हणून बऱ्याचदा हे होतं. हादेखील तुमच्या लग्नाचा एक संकेत असू शकतो.

  • प्रेम नवं नवं असताना आपल्या पार्टनरसोबत प्रत्येक विकेंडला डेटवर जाणं अनेकांना आवडत. एकाच व्यक्तीसोबत हे वारंवार होतंय आणि तुम्हाला ती व्यक्ती खूपच आवडत असेल तर हे लग्नाचे शुभ संकेत असल्याचे तुम्ही मानू शकता.