विटा-वाळूज एसटी उलटली, 38 विद्यार्थी जखमी

accdent

सांगली :- विटा-वाळूज या एसटी बसला झालेल्या अपघातात 38 शालेय विद्यार्थी जखमी झाले सर्व जखमी मुलांवर विटा ग्रमीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही बस विटा आगाराची आहे. समोरून येणार्‍या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस घसरून रस्त्याच्या कडेला उलटली. देवनगर परिसरातील एका वळणावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.