“विटामिन ए आत्मप्रतिष्ठा “( भाग 2)

Self Esstem

हाय फ्रेंड्स! आपण काल बघितल्याप्रमाणे स्वतःला स्वीकारणं, स्वतःबद्दल प्रेम, आदर असणे, स्वयंशिस्त, आत्मविश्वास, आत्मसन्मानाची योग्य जाणीव असेल तर mअशी व्यक्ती स्वतः cool असू शकते, आणि दुसर्यांशीही ती शांतपणे वागू शकते. स्वतःमध्ये एखादी गोष्ट असल्याशिवाय आपण ती इतरांमध्ये कशी रुजविणार ? विमानात सुद्धा सुरुवातीला सुरक्षिततेसाठी स्वतःला मास्क चढवायला सांगतातच की !

आता म्हणूनच, त्यामागची थोडी मानसशास्त्रीय बाजूही लक्षात घेऊया! व्यक्तीच्या विकास काळामध्ये विविध अवस्थांमधून प्रत्येक व्यक्ती समोर सरकत असते. फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञानूसार जे विकासाचे पाच टप्पे आहेत, त्यात प्रत्येक टप्प्यावर काही एक संघर्ष करून त्याचे व्यक्ती यशस्वी निराकरण करते आणि पुढच्या विकास अवस्थेत प्रवेश करते. यापैकी कुठल्याही विकासावस्थेमध्ये न सुटलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणजे स्थिरण, fixation ! तिथे मानसिक गडबड सुरू होते.

यात पालक कुठली भूमिका बजावतात ? तर पालकांनी गरजेपेक्षा जास्त विरोध केल्यास त्या त्या वयाच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा भागवल्या न गेल्याची भावना मुलांच्या मनात राहते. याउलट मुलांना जर गरजेपेक्षा जास्त गुंतू दिले, तर मूल वाढीच्या पुढच्या टप्प्यात जायला उत्सुक असत नाही. विकासाच्या मार्गातला न सुटलेल्या संघर्ष फिक्सेशनला कारणीभूत होतो. थोडक्यात या विकासाच्या टप्प्यांवरची योग्य वाटचाल आरोग्यपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार करते.

ही बातमी पण वाचा : “विटामिन ए — आत्मप्रतिष्ठा !”

रॉजर्स म्हणजे या शास्त्रज्ञाने सुद्धा सकारात्मक स्व संदर्भाची गरज म्हणजे व्यक्तीने स्वतःच, स्वतः ला मान्यता देणे ही मांडणी आहे. मुलाला मिळणारी शाबासकी, आयुष्यातील चांगले वाईट शिकण्याला कारण ठरते. तर मुलाचे मित्र मैत्रिणी जेव्हा त्याला किंवा तिला कमी लेखतात ,चिडवतात तेव्हा ती चिडचिड बनते .पण जेव्हा त्या व्यक्तीला स्वतः गुणांची किंमत कळते तेव्हा स्वतःतील गुणांची वाढ हेच तिचे मुख्य धेय्य बनते.

मॅस्लो या शास्त्रज्ञांच्या गरजांच्या पिरॅमिडमध्ये पण ,शारीरिक गरजा, तहान-भूक, सुरक्षितता नंतर आपलेपणाची प्रेमाची गरज जेव्हा पूर्ण होते, तेव्हा मूल खूष होऊन कौशल्य आत्मसात करण्याचा, सक्षम होण्याचा प्रयत्न करते, लोकांचे लक्ष वेधून घेते, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो व ते आनंदी होते, जास्तीत जास्त यशस्वी होण्यास प्रवृत्त होते.उदा. घरातील लोक शेजारी ऐश्वर्या वर खूप प्रेम करतात त्यामुळे ती अधिक कठोर परिश्रम घेतले.पण सोनल मात्र दुर्लक्षित असल्याने तिच्यात कठोर परिश्रमांची इच्छाच निर्माण होत नाही.

फ्रेंडस ! ही थोडी किचकट बाजू मांडली खरी ! पण त्यामागे उद्देश फक्त एवढाच होता की जिला आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे ,ती आत्मप्रतिष्ठा मिळवण्यासाठी बालपणाचा काळ किती महत्त्वाचा आहे. आणि पालकांची सजत जाणीवही किती महत्त्वाची आहे.

त्यामुळे प्रत्येक पालकांनी जर मुलांच्या बालपणाच्या वेळी आपला वेळ ,आपले प्रेम, आपली सजगता यांची गुंतवणूक केली तर त्याचे रिटर्न्स फार जबरदस्त आहेत.

आपल्या मागील (ट्रान्झ्याकशनल एनालिसिस) शी संबंधित लेखामध्ये सुद्धा” आय एम नॉट ओके, यु आर ओके” पासूनचा “आय ॲम ओके’ यू आर ओके” पर्यंतचा प्रवास तरी दुसरं काय सांगतो? बालपण हे” सहजतेने “ही घ्यावं ते आनंद देणारे होण्यासाठी, त्याच वेळी मुलांच्या नकळत, ते” सजगतेने “पण घ्यायला हवे ते आत्म प्रतिष्ठेसाठी !

मुले जगतात तसेच शिकतात मुलांचे आदर्श असणारे आई-वडील ,शिक्षक ,राजकीय नेते आणि अगदी खरतर पिक्चरचे हिरो सुद्धा! मुले आपल्या आवडत्या हिरो ला फॉलो करत असतात. नुकतेच टीव्हीवर दररोज संध्याकाळी अमिताभ बच्चन ,शाहरुख खान यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे फॅन्स कशी गर्दी करतात हे दाखवले.बरेच जण सुशांतसिंगला बॉडी बिल्डिंग साठी फॉलो करायचे.

अशा या इंडस्ट्रीत जर आता अफू ,गांजा ,ड्रग्स चे धूर निघताना दिसले ,तर या तरुण मनाची अवस्था काय होईल ? आपले आदर्श तकलादू ,खोटे आहेत. त्यामुळे आदर नाहीस होईल .ते निराश होतील किंवा अत्यंत वाईट बाब म्हणजे अशा गोष्टीनाही ते सरावतील.

तुलना करीत राहिल्याने न्यूनगंड निर्माण होऊ शकतो .त्यामुळे दुसऱ्याच्या पुढे जाण्याची स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते .पण उच्च आत्मप्रतिष्ठा असलेली व्यक्ती इतरांशी तुलना न करता आपली कामगिरी सुधारतात. स्वतःच्या कामगिरीची स्व क्षमतेशी तुलना करतात.

क्रीडा मार्गदर्शक एखादा चांगला खेळाडू जर मनातून खचला तर त्याचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी त्याला कमी कामगीरी असणार्या बरोबर खेळायला लावतात.

शिस्तीच्या चुकीच्या कल्पना ,वरिष्ठांकडून केली जाणारी परिपूर्णतेची किंवा अवास्तव अपेक्षा. आत्म प्रतिष्ठेला घातक ठरते.
मग सकारात्मक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी काय करायचं?

  • काही चरित्र, आत्मचरित्र वाचायची. अशा वेळी लक्षात येतं की या मोठ्या लोकांकडे न्यून गोष्टी होत्या. पण त्याचं त्यांनी यशात रूपांतर केलं. मध्यंतरी कुठल्यातरी स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालात कुणी मुलगी स्मशानाची त्याच्या प्रकाशात अभ्यास करून यशस्वी झाली असे वाचले होते. आंधळ्या असलेल्या मिल्टननी निसर्गावर उत्तम कविता केल्या.
  • आऊट ऑफ द वे जाऊन विचार करणे.बरेचदा काही गोष्टींमुळे आपल्याला अमुक एक गोष्ट अशक्य आहे असे वाटते. पण त्यावेळी जर असा वेगळा विचार करून बघितला ,तर लक्षात येतं की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. नेपोलियनने म्हटल्याप्रमाणे “इम्पॉसिबल इस नोट ए वर्ड इन माय डिक्शनरी” असे मनाशी ठरवावे लागेल.
  • बरेचदा कुणीतरी सांगितल्यामुळे किंवा उगीचच स्वतः ठरवून आपण आपल्या मर्यादा किंवा क्षितीज फार छोटा करून ठेवतो. पण जेव्हा त्या माहित नसतात तेव्हा कधीकधी तीच व्यक्ती जास्त मोठी झेप घेऊ शकते. त्यामुळे मर्यादा विस्तारीत जाणे अर्थात पायरीपायरीने खूप आवश्यक असते.
  • समाजसेवक बनल्याने आत्मप्रतिष्ठा जाणवू लागते. परत परतफेडीची अपेक्षा न करता आपण जेव्हा दुसऱ्याला काही देतो किंवा दुसऱ्यांसाठी काही करतो त्यावेळी आपल्याला आनंद होतो ,एक प्रकारचे समाधान मिळते. त्याने स्व अभियानात भर पडते.
  • दुसर्‍याची प्रशंसा करण्याची एकही संधी व्यर्थ जाऊ देऊ नये, म्हणजेच दुसऱ्याचे दोष न शोधता गुण शोधत जाणे आणि अगदी मनापासून ! तसेच स्वतःचे कौतुकही नम्रपणे स्वीकारावे.यामुळे सतत दुसर्याला कमी लेखून स्वतःचा बडेजाव करण्याचे कमी आत्म् प्रतिष्ठेचे लक्षण स्वभावा तून जाईल.
  • जबाबदारी स्वीकारणे. जेव्हा आपण या जगात वावरत असतो, काही कृत्य करतो, तेव्हा स्वतःच्या वागण्याची, स्वतःच्या या कृत्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकने किंवा आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे, वा त्यासाठी सबबी सांगणे थांबवावे.
  • याबरोबरच आपले उद्दिष्ट ठरवणे.
  • चांगली संगत ठेवणे .
  • बाहेरून मिळणाऱ्या मोटिवेशन पेक्षा ,स्वतःला स्वतः मोटिवेट करणे हे खूप खूप गरजेचे आहे आहे

दुसऱ्यांचा तुम्हाला कमी लेखण्याचा उद्देश सफल होऊ शकत नाही, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा, “दि गुड लाईफ इज ए प्रोसेस,नॉट ए स्टेट ऑफ बीईंग इट इज ए डायरेक्शन, नॉट ए डेस्टिनेशन !”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER