खासदार इम्तियाज जलील यांच्या कडून गंगापूर तालुक्यातील गावांना भेट

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून

Imtiaz Jalil

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार इम्तियाज जलिल यांनी गंगापुर तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली ेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेतले व ते सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे तसे या प्रश्न लोकसभेत प्रश्न मांडू असे आश्वासन त्यांनी दिले.सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपायी देण्यात यावी असे निवेदन दुष्काळ दौऱ्या अगोदरच खासदार सय्य्यद इम्तियाज जलील यांनी मुखमंत्र्यांना सादर केले होते.

११ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची थेट शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यावर जाऊन पिकांची पाहणी व शेतकऱ्यांसोबत त्यांच्या समस्येबाबत चर्चा खासदार सय्य्यद इम्तियाज जलील यांनी केली. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न व दुष्काळाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार.

ही बातमी पण वाचा : मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ३०० महिलांची तपासणी

पुढील गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करण्यात आली जणगाव पोळ, प्रतापपूर वाडी, फुलशिवरा गाव, गोळेगाव, सिद्धनाथ, वडगाव, भेंडाळा, गळनिंब, पखोरागाव, गळनिंबगाव, अगरवाडगाव, भिवधानोरा गाव, धनगरपट्टी, जामगाव इत्यादी.या ओला दुष्काळ दौऱ्या मध्ये खासदार इम्तियाज जलीलसह वैजापूर गंगापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, गंगापूर तहसीलदार अविनाश शिंगटे, वैजापूर तहसीलदार गुंड्डमवार तसेच सम्बंधित सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी, सर्व मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांची प्रामुख्याने उपस्तीथी होती