पावसाळ्यात आपल्या पार्टनर सोबत ‘या’ रोमॅंटिक स्पॉटला नक्की भेट द्या..

couples

सध्या देशातील काही भागामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे. अनेकजण पावसात फिरायला जाण्याच्या तयारीला लागले आहेत. विशेषतः कपल्स..पावसाळा तर कपल्स साठी रोमॅंटिक सण म्हणालात तरी चालेल. मघ त्यासाठी रोमॅंटिक डेस्टिनेशन पण हवी ना..जर तुम्ही आपल्या पार्टनर सोबत बाहेर जाण्याचा प्लान करताय तर हे स्पॉट तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या काय आहेत ते…

  • मेघालय :- पावसाची हळुवार रिमझीम तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही मेघालयात फिरायला जायला हवं. मेघालयाला ढगांचं घर असंही म्हटलं जातं. कारण इथे जवळपास वर्षभर पाऊस होत असतो. पण तरीही पावसाळ्यात येथील नजारा काही वेगळाच असतो. पावसांच्या सरींमध्ये येथील निसर्ग आणखीन सुंदर होतो.

  • केरळ :- परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारं केरळ हे नदी आणि डोंगरांनी वेढलं गेलेलं आहे. केरळच्या नैसर्गिक सुंदरतेसमोर सगळंकाही गौण वाटायला लागतं. केरळमध्ये पावसाळ्याला ड्रिम सीझन म्हणूनही ओळखलं जातं. समुद्राचं जे रुप केरळमध्ये बघायला मिळतं तसं कुठेही बघायला मिळत नाही. त्यामुळे या दिवसात इथे जास्त प्रमाणात पर्यटक येतात. तुम्हीही हा पावसाळा अधिक रोमॅंटिक आणि यादगार करण्यासाठी इथे जाऊ शकता.

  • गंगटोक :- सिक्कीमची राजधानी आणि सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगटोकमध्ये पावसाळ्यात स्वर्गाचा आनंद मिळतो. इतर ऋतूंमध्ये तर इथे पर्यटकांची गर्दी असतेच पण पावसाळ्यात येथील वातावरण अधिक रोमॅंटिक असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इथे पावसाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

  • दार्जिलिंग :- दार्जिलिंग शहराला पश्चिम बंगालचा स्वर्गही म्हटलं जातं. इथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. हे शहर चहाच्या बागांसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या शहराची सैर करणं एक अविस्मरणिय अनुभव असेल.

आपल्या पार्टनर सोबत या ठिकाणी नक्की जा…तुमच्या पार्टनरला हे नक्की आवडेल..