महाडिकांची सत्ता पालटल्याचे बक्षीस; गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांची निवड!

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी काही दिवसांपूर्वी मतदान पार पडले. गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत. गोकुळ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाडिक गटातून सतेज पाटील यांच्या गटात प्रवेश केला होता.

गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले. गोकुळातील महाडिकांना तीन दशक उलथून टाकण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. यामुळेच बक्षीस म्हणून विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

गोकुळ निवडणूक

४ मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी गोकुळच्या २१ जागांपैकी १७ जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी महाडिक गटाला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले. गोकुळ दूधसंघातील २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी ३ हजार ६५० पात्र सभासद होते. मात्र, दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सुरुवातीपासूनच आव्हान दिले होते. शेवटी सतेज पाटील गटने विजयश्री खेचून आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button