विश्वनाथन आनंदला पितृशोक

माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू (Chess player) विश्वनाथन आनंद (Vishwanathan Anand) ह्याला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील  के. विश्वनाथन (K. Vishwanathan) यांचे १५ एप्रिल रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने चेन्नईतील एका दवाखान्यात निधन झाले. के. विश्वनाथन हे दक्षिण रेल्वेचे माजी सरव्यवस्थापक होते. त्यांच्यापश्चात आनंदच्या आई सुशीला, आनंदसह दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

विश्वनाथन आनंद जगज्जेता बुद्धिबळपटू बनण्यात त्यांच्या प्रोत्साहन व पाठबळाचा फार मोठा वाटा होता. आई सुशीला यांनी आनंदला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले तर के. विश्वनाथन यांनी त्याला हा खेळ खेळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली. त्याला बुद्धिबळाच्या देशविदेशातील स्पर्धात सहभागी होण्याची सर्व काळजी त्यांनी घेतली. त्याला आर्थिक अडचणीमुळे स्पर्धात भाग घेता येणार नाही असा प्रसंग कधीही येऊ दिला नाही. साधे सरळ व्यक्तिमत्त्व असलेल्या के. विश्वनाथन यांनी आपल्या मुलालाही साध्या राहणीचेच पण उत्तम विचारांचे संस्कार दिले. त्यांना आनंदचा आणि त्याच्या यशाचा खूप अभिमान होता. रेल्वेतील सेवेबद्दलही ते अतिशय समाधानी होते, असे त्यांच्या स्नुषा आणि विश्वनाथन आनंदच्या पत्नी अरुणा आनंद यांनी सांगितले.

आनंदला त्यांचा फार मोठा आधार होता आणि त्यांनी त्याच्या पाचही विश्वविजेतेपदाच्या लढती बघितल्या होत्या, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button