राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण

Vishwajeet Kadam - Corona Positive

सांगली : सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam ) यांना काेरोनाची (Corona) लागण झाली आहे. तशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. तब्येत ठीक असून सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे कदम म्हणाले की, माझा पलूस कडेगाव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज…

अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो.

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगावी ही विनंती.

माझ्या तब्येतीला कोणताही धोका नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करेन. संसर्गातून पूर्ण बरा होत लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास व्यक्त करतो.

सध्या तरी योग्य काळजी आणि खबरदारी घेत आहे!

#सदैव_आपल्यासोबत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER