चांदोली धरणातून विसर्ग वाढला : सांगलीला धोका

Chandoli Dam

सांगली :- चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात 165 मिलिमीटर पाऊस येथे पडला. गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी दोन वाजता धरणाचे चारही दरवाजे उघडून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून चौदाशे कयुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीच्या (Krushna River) पाणी पातळीत वाढ होणार असल्याने सांगली शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात 22 हजार 120 कयुसेक पाण्याची आवक होत आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी दोन मीटरने वाढली आहे.

मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. आरळा शित्तुर पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER