प्रहारच्या आंदोलनात दानवेंच्या जावयांची विरूगिरी

Aurangabad

औरंगाबाद : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनात दानवेंच्या जावयांचीच सासऱ्याविरोधात विरूगिरी पाहायला मिळाली.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यामुळे प्रहाराचं आंदोलन असतानाही सासऱ्याविरोधात जावई टाकीवर पोहचल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या २४ तासांपासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीविरोधात शिवाजीनगर पाण्याच्या टाकीला पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER