हायकोर्टात पुन्हा व्हर्च्युअल, हायब्रिड पद्धतीने सुनावणी कोर्टातील गर्दी कमी करण्यासाठी उपाय

मुंबई: राज्यात कोरोना (Corona virus) रुग्णांची संख्या पुन्हा झापाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कोर्टात होणारी वकिलांनी व पक्षकारांची गर्दी कमी करण्यासाठी, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या मुंबईतील मुख्य न्यायपीठात यापुढे सर्व प्रकरणांची सुनावणी ‘व्हर्च्युअल’ (Virtual Hearing) किंवा ‘हायिब्रड’ पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अत्यंत तातडीची फौजदारी प्रकरणे याला अपवाद असतील व त्यांची सुनावणी फक्त न्यायदालनाच प्रत्यक्ष पद्धतीने घेण्यात येईल.

प्रशासकीय न्यायाधीशांच्या समितीमध्ये झालेल्या निर्णयानंतर न्यायालयाच्या व्यवस्थापनाने या नव्या व्यवस्थेची अधिसूचना प्रसिद्ध केली. ही नवी व्यवस्था बुधवार ७ एप्रिलपासून लागू झाली असून ती ३० एप्रिलपर्यंत सुरु राहील. या खेरीज ११ ते १७ एप्रिल या दरम्यान न्यायालयास सुट्टी असेल, असेही यात नमूद करण्यात आले.

‘व्हर्च्युअल’ म्हणजे न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने घेतली जाणारी सुनावणी. ‘हायब्रिड’ सुनावणी म्हणजे प्रत्यक्ष व ‘व्हर्च्युअल’ या दोन्ही पद्धतींचे संमिश्रण. यात पक्षकार व वकिलांना आपल्या प्रकरणाची सुनावणी ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने व्हावी की प्रत्यक्ष पद्धतीने हे ठरविण्याचा पर्याय असेल. त्यांना हा पर्याय सुनावणीच्या अपेक्षित वेळेपूर्वी किमान ४८ तास आधी कळवावा लागेल.

न्यायालयात कार्यरत असलेल्या एकूण २५ व्दिसदस्यीय व एकल खंडपीठांची विभागणी या तीन पद्धतीने काम करण्यासाठी करण्यात आली आहे. दिवाणी प्रकरणांच्या ‘हायब्रिड’ पद्धतीने सुनावणीसाठी तीन व्दिसदस्यीय खंडपीठे उपलब्ध असतील. सहा व्हिदस्यीय खंडपीठे व आठ एकल न्यायाधीशांची खंडपीठे फक्त ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने सुनावणी करतील. एक व्दिसदस्यीय खंडपीठ फौजदाीर प्रकरणांची ‘व्हर्च्युअल’ सुनावणी करेल तर एकल न्यायाधीशांची सहा खंडपीठे तातडीच्या फौजदारी प्रकरणांच्या प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपलब्ध असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button