टी-20 मध्ये विराटची ही ‘विराट’ कामगिरी

Virat Kohli

भारताने (India) पहिल्या सामन्यापाठोपाठ दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला (Australia) मात देत टी-20 (T20 Cricket) सामन्यांची मालिका खिशात घातली आणि यासोबतच विराट कोहलीची (Virat Kohli) यशस्वी कर्णधार म्हणून हेवा वाटण्याजोगी मालिका विजयाची परंपरा कायम राहिली. त्याच्या नेतृत्वात 2017 पासून गेल्या 12 टी-20 मालिकांपैकी (3 किंवा अधिक सामने) एकही मालिका भारताने गमावलेली नाही.

या 12 मालिकांपैकी तीन मालिका बरोबरीत सुटल्या आहेत पण भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात तीन पेक्षा अधिक सामने असलेली एकही टी20 मालिका गमावलेली नाही. यापैकी 2018 मधील दक्षिण आफ्रिकेविरुध्दची मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती. त्यातील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते आणि तो सामनासुद्धा आपण जिंकत मालिका जिंकली होती.

विराटची यशाची मालिका अशी

2-1 वि. इंग्लंड, 2017
1-1 वि. ऑस्ट्रेलिया, 2017
2-1 वि. न्यूझीलंड, 2017
2-1 वि. दक्षिण आफ्रिका, 2018
(शेवटच्या सामन्यात रोहित कर्णधार)
2-1 वि. इंग्लंड, 2018
1-1 वि. ऑस्ट्रेलिया, 2018
3-0 वि. वेस्ट इंडीज, 2019
1-1 वि. दक्षिण आफ्रिका, 2019
2-1 वि. वेस्ट इंडीज, 2019
2-0 वि. श्रीलंका, 2020
4-0 वि. न्यूझीलंड, 2020
2-0 वि. ऑस्ट्रेलिया, 2020

यापैकी ज्या मालिकांमध्ये दोनच सामने दिसत आहेत त्या सर्व मालिका प्रत्यक्षात तीन सामन्यांच्याच होत्या. त्यातील एका सामन्यात खेळ होऊ शकलेला नव्हता.

खरंतर भारताने ऑक्टोबर 2015 पासून तीन किवा अधिक सामन्यांची टी20 मालिका गमावलेली नाही. विराटच्या आधी धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुध्द 3-0, श्रीलंकेविरुध्द 2-1, झिम्बाब्वेविरुध्द 2-1 आणि इंग्लंडविरुध्द 2-1 अशा मालिका जिंकलेल्या आहेत आणि शेवटची तीन सामन्यांची मालिका आपण ऑक्टोबर 2015मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द गमावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER