
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी ICC Awards of the decade) च्या दशकाच्या पुरस्कारांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) हा दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि वन डे क्रिकेट मधील गेल्या 10 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) याला खेळाडूवृत्तीचा पुरस्कार (स्पिरीट आॕफ क्रिकेट Spirit of Cricket) मिळाला आहे.
विराट कोहलीला कसोटी, वन डे आणि टी-20 या तिन्ही प्रकारात सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले होते. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार विराट कोहलीला मिळाला आहे.
कसोटी क्रिकेटसाठी आॕस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हा तर टी-20 क्रिकेटसाठी अफगणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
2011 मध्ये पंचांनी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला बाद दिलेले असल्यानंतरही महेंद्रसिंग धोनीने त्याला परत बोलावले होते. यासाठी त्याला खेळाडूवृत्ती पुरस्कार देण्यात आला आहे.
टी-20 च्या पुरस्कारासाठी राशिदखानची स्पर्धा विराट कोहाली, आरोन फिंच, ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, इम्रान ताहीर व लसिथ मलिंगा यांच्याशी होती.
वन डे क्रिकेटसाठी विजेत्या विराट कोहलीशिवाय एम.एस. धोनी, लसिथ मलिंगा, कुमार संघकारा, रोहित शर्मा, मिशेल स्टार्क आणि एबी डीविलियर्स स्पर्धेत होते.
कसोटी क्रिकेटच्या पुरस्कारासाठी स्टिव्ह स्मिथच्या स्पर्धेत विराट कोहली, जेम्स अँडरसन, रंगना हेराथ, जो रुट, यासिर शाह आणि केन विल्यमसन होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला