विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरची छोटी मुलगी इंडीला भेट म्हणून दिली स्वत: ची प्लेयिंग जर्सी

Virat Kohli presents his playing jersey to David Warner youngest daughter Indy

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याला खूप पसंत केले आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये आता एक नवीन नाव जोडले गेले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याला खूप पसंत केले आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये आता एक नवीन नाव जोडले गेले आहे. ती इतर कोणी नाही तर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) धाकटी मुलगी इंडी रे आहे.

वॉर्नरच्या मुलीला गिफ्ट केली जर्सी

विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर मैदानात एकमेकांविरूद्ध खेळत असले तरी मैदानाबाहेर हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. म्हणूनच ऑस्ट्रेलियाहून भारतात परत येण्यापूर्वी त्याने वॉर्नरची मुलगी इंडी रेला त्याची कसोटीची जर्सी भेट म्हणून दिली आणि त्यावर तिला ऑटोग्राफही दिला.

विराटची चाहती आहे वॉर्नरची मुलगी

डेव्हिड वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या मुलीचे छायाचित्र पोस्ट केले होते, त्यावर लिहिले होते की, ‘मला माहित आहे की आम्ही मालिका गमावली परंतु येथे आमच्या जवळ खूप आनंदित मूल आहे. तुझ्या प्लेयिंग जर्सी दिल्याबद्दल आभार विराट कोहली. इंडीला हे खूप आवडले. डॅडी आणि आरोन फिंचशिवाय तिला विराट कोहली खूप आवडतो.’

तीन मुलींचा पिता आहे वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर घरी तीन चिमुकल्या आहे. इवी मे, इंडी रे आणि इसला रोज अशी त्यांची नावे आहेत. वॉर्नर जेव्हा क्रिकेटमध्ये व्यस्त असतो तेव्हा त्याची पत्नी कॅन्डिस वॉर्नर तिन्ही मुलींची पूर्ण काळजी घेते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER