
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या (India Vs Australia) डे-नाईट अॅडिलेड कसोटीच्या (Adelaide Test Match) आरंभीच भारतीय संघाला शूभसंकेत मिळाले आहेत. त्यातून भारतीय संघ एकतर हा सामना जिंकेल किंवा अनिर्णित तरी राखेल, पण गमावणार नाही असे संकेत मिळताहेत कारण नाणेफेक (Toss) विराट कोहलीने (Virat Kohli) जिंकली आहे आणि कोहलीने नाणेफेक जिंकलेल्या आधीच्या 25 कसोटी सामन्यांपैकी एकही सामना भारताने गमावलेला नाही. 21 जिंकले आहेत आणि चार अनिर्णित राहिले आहेत म्हणजे यशाची टक्केवारीसुध्दा घसघशीत आहे. त्यामुळे अॅडिलेड कसोटीत कोहलीने नाणेफेक जिंकणे हा भारतासाठी शूभसंकेतच म्हणावा लागेल.
कोहली आणि नाणेफेकीची ही यशस्वी मालिका जून 2015 पासून सुरु आहे. बांगलादेशविरुध्दच्या फातुल्ला कसोटीत त्याने नाणेफेक जिंकल्यावर भारताने तो सामना अनिर्णित राखला होता. त्यानंतर भारतात दक्षिण आफ्रिकेविरुध्द, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुध्द कोहलीने नाणेफेकीसह कसोटी सामने जिंकले तर परदेशातही श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाविरुध्दही त्याने असेच यश मिळवले आहे.
गेल्यावेळच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने अॅडिलेड व मेलबोर्नचे कसोटी सामने नाणेफेकीसह जिंकले होते तर सिडनीचा सामना अनिर्णित राहिला होता. आता पुन्हा अॅडिलेडलाच कोहलीने नाणेफेक जिंकली आहे. गेल्यावेळी विजय मिळाला होता. यावेळीसुध्दा त्या यशाची पुनरावृत्ती होईल का याची आता प्रतिक्षा आहे.
याउलट कोहलीने नाणेफेक गमावलेल्या 30 कसोटी सामन्यांपैकी 12 सामने गमावले आहेत तर तेवढेच सामने जिंकलेसुध्दा आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला