विराट कोहलीचा हा विक्रम तुम्हाला थक्क करेल!

Virat Kohli

विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगलाच फाॕर्मात आहे. इंग्लंडविरुध्दच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत 0, 73, 77, 1 आणि 80 धावांच्या खेळी केल्यावर आता वन डे सामन्यांच्या मालिकेतही त्याने 56 व 66 धावांच्या खेळी केल्या आहेत. याप्रकारे मागच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पाच अर्धशतकं झळकावली आहेत.

वन डे सामन्यांचाच विचार केला तर इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या वन डे सामन्यातील 66 धावा हे त्याचे सलग चौथे अर्धशतक आहे. गेल्या चार वन डे सामन्यांत त्याने अनुक्रमे 66, 56, 63 व 89 धावांच्या खेळी केल्या आहेत.

आपल्या 253 वन डे इंटरनॅशनल सामन्यांच्या 244 डावात विराटने लागोपाठ चार अर्धशतके झळकावण्याची ही पहिली दुसरी नाही तर तब्बल सातवी वेळ आहे आणि याबाबतीत तो इतरांच्या मैलो पुढे आहे. सर्वाधिक वेळा लागोपाठ अर्धशतके झळकावण्यात दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संघकारा आहे. त्याने चार वेळा अशा खेळी केल्या आहेत. म्हणजे विराट जवळपास दुपटीने त्याच्या पुढे आहे.

1) दोन शतकं, दोन अर्धशतकं
विराटने वन डे सामन्यांमध्ये पहिल्यांदा लागोपाठ चार अर्धशतके झळकावली 2010 मध्ये. त्यावेळी त्याने आॕस्ट्रेलियाविरुध्द 118 धावा केल्यानंतर न्यूझीलंडविरुध्द 105, 64 व 63 धावांच्या खेळी केल्या होत्या.

2) चार शतकं आणि एक अर्धशतक
यानंतर 2012 मध्ये श्रीलंकेविरुध्द 133 व 108 धावांच्या खेळींनंतर बांगलाविरुध्द 66, पाकिस्तानविरुध्द 183 आणि श्रीलंकेविरुध्द 106 धावांच्या त्याच्या खेळी होत्या.

3) दोन शतकं, तीन अर्धशतकं
2013 मध्ये झिम्बाब्वेविरुध्द 68 धावानंतर आॕस्ट्रेलियाविरुध्द 61, 100, 68 व 115 अशा त्याच्या खेळी होत्या.

4) दोन शतकं, दोन अर्धशतक
2016 मध्ये पुन्हा आॕस्ट्रेलियाविरुध्दच विराटने 91, 59, 117 व 106 धावांच्या खेळी केल्या होत्या.

5) तीन शतकं आणि एक अर्धशतक
2018 मध्ये त्याने इंग्लंडविरुध्द 71 धावा केल्यावर वेस्ट इंडिजविरुध्द 140, 157 व 107 अशा लागोपाठ तीन शतकी खेळी केल्या होत्या.

6) सलग पाच अर्धशतकं
2019 मध्ये विराटने पुन्हा लागोपाठ पाच अर्धशतकी खेळी केल्या. यावेळी 82 (आॕस्ट्रेलिया) , 77 (पाकिस्तान) , 67 (अफगणिस्तान) , 72 (वेस्ट इंडिज) व 66 (इंग्लंड) अशा त्याच्या खेळी होत्या.

7) सलग चार अर्धशतकं
यानंतर आता त्याने आॕस्ट्रेलियाविरुध्द 89 व 63 धावा केल्यानंतर इंग्लंडविरुध्द 56 व 66 धावांच्या खेळी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER