आयसीसी पुरस्कार नामांकनांवर विराट कोहलीचा दबदबा

Virat Kohli

पाच गटात नामांकन, सात भारतीय खेळाडू पुरस्कारांचे दावेदार कोहालीसह आश्विन सर्वोच्च पुरस्काराच्या स्पर्धेत धोनीला दोन नामांकने मिताली राज व झुलनही पुरस्काराच्या स्पर्धेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी (Best Cricket Player Awards) नामांकने जाहीर केली आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) दबदबा असून त्याला पाच वेगवेगळ्या गटात नामांकित करण्यात आले आहे. त्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू या सर्वात महत्त्वाच्या पुरस्कारासाठीही त्याला नामांकन मिळाले. त्याच्यासह भारताचाच अष्टपैलू रविचंद्रन आश्विन (R. Ashwin) हासुध्दा दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराच्या स्पर्धेत आहे.

३२ वर्षीय विराट कोहली याला प्लेयर ऑफ दी डिकेडसह वन डे, टी-२० इंटरनॅशनल, टेस्ट प्लेयर ऑफ दी डिकेड, आणि स्पिरीट ऑफ क्रिकेटसाठी नामांकन मिळाले आहे.

दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी (प्लेयर ऑफ दी डिकेड) साठी कोहली व आश्विनशिवाय स्टीव्ह स्मीथ, केन विल्यमसन; ए.बी.डी. विलीयर्स, कुमार संघकारा आणि जो रुट हेसुद्धा दावेदार आहेत.

भारतीय खेळाडृूंपैकी कोहली व आश्विनसह एम.एस.धोनी, रोहित शर्मा, मिताली राज व झुलन गोस्वामी हे सुध्दा वेगवेगळ्या पुरस्कारांचे दावेदार आहेत. धोनीला वन डे सामन्यांचा प्लेयर ऑफ दी डिकेड व स्पिरीट ऑफ क्रिकेटसाठी नामांकन मिळाले आहे तर रोहित शर्मा टी२० सामन्यांसाठी दावेदार आहे.

पुरस्कारनिहाय नामांकन असे :

प्लेयर ऑफ दी डिकेड- विराट कोहली, आर.आश्वीन (भारत), जो रुट (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), एबी डी विलीयर्स (द. आफ्रिका), स्टीव्ह स्मीथ (ऑस्ट्रेलिया), कुमार संघकारा (श्रीलंका)

महिला प्लेयर ऑफ दी डिकेड- मिताली राज (भारत), एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सुझी बेटस (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज), सारा टेलर (इंग्लंड)

टेस्ट प्लेयर ऑफ दी डिकेड- विराट कोहली (भारत), जो रुट, जेम्स अँडरसन (इंग्लंड), स्टीव्ह स्मीथ (ऑस्ट्रेलिया), केन विल्यमसन (न्यूझीलंड), रंगना हेराथ (श्रीलंका), यासीर शहा (पाकीस्तान)

वन डे प्लेयर ऑफ दी डिकेड- विराट कोहली, रोहीत शर्मा, एम.एस.धोनी (भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), एबी डी विलीयर्स (द. आफ्रिका), कुमार संघकारा (श्रीलंका)

वुमेन वन डे प्लेयर ऑफ दी डिकेड- मिताली राज, झुलन गोस्वामी (भारत), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया),एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), सुझी बेटस (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज),

टी२० वन डे प्लेयर ऑफ दी डिकेड- िवराट कोहली, रोहित शर्मा (भारत), राशीद खान (अफगिणस्तान), इम्रान ताहीर (द. आफ्रीका), आरोन फींच (ऑस्ट्रेलिया), लसीथ मलींगा (श्रीलंका), ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)

महिला टी२० वन डे प्लेयर ऑफ दी डिकेड- मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया),एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया),सोफी डेव्हीन (न्यूझीलंड), डीयांद्रा डाॉटीन (वेस्ट इंडीेज), एलीसा हिली (ऑस्ट्रेलिया), अन्या श्रुबसोल (इंग्लंड)

स्पीरीट ऑफ क्रिकेट- विराट कोहली, एम.एस.धोनी (भारत), केन विल्यम्सन (न्यूझीलंड), अन्या श्रुबसोल (इंग्लंड), मिसबा उल हक (पाकिस्तान), ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड), कॅथरीन ब्रेंट (इंग्लंड), महेला जयवधर्धने (श्रीलंका), डॅनीयल व्हेट्टोरी (न्यूझीलंड)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER