कर्णधार कोहलीने रचला विक्रम, तो ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू

Virat Kohli

अडलेड : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. हा विक्रम करताना तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिगज्जाच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने सर डॉन ब्रॅडमन याला मागे टाकत सर्वोत्तम फलंदाज होण्याचाही मान पटकावला आहे. भारतासह कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला.

ही बातमी पण वाचा : ७० वर्षात प्रथमच टीम इंडियाची अॉस्ट्रेलियात विजयी सुरुवात

कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 9 सामने खेळावे लागले. सर ब्रॅडमन यांना ऑस्ट्रेलियामध्ये हजार धावा पूर्ण करण्यासाठी 10 कसोटी सामने खेळावे लागले होते. 1931 साली सर ब्रॅडमन यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला होता. तर त्यांचा हा विक्रम आज शनिवारी विराट कोहली याने मोडीत काढला.

आठ धावा करत कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीव्ही एस लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करून यजमानांना धोक्याचा इशारा दिला होता. कोहलीने घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 92 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने 8 डावांत 692 धावा केल्या होत्या. स्टीव्हन स्मिथनंतर ( 769) त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. त्या मालिकेत कोहलीने चार शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ही बातमी पण वाचा : आणखी चांगली कामगिरी होऊ शकली असती- कोहली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने काही धावा करत महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, परंतु कोहलीसाठी हा दौरा संस्मरणीय ठरला होता. त्याने त्या दौऱ्यात खोऱ्याने धावा केल्या होत्या. या गोष्टीचा फायदा त्याला या दौऱ्यातही झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टी-20 मालिका बरोबरीत सोडवली. यामुळे भारत पराभवापासून सावरला. मात्र कसोटी मालिकेत पहिला सामना भारत आपल्या पदरात टाकण्याच्या वाटेवर आहे.