विरुष्काची कोरोना लढाईसाठी दोन कोटींची मदत

Virat Kohli and Anushka Sharma

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma). यांनी कोविड- १९ (Covid-19) मदतनिधीला दोन कोटींची देणगी जाहीर केली आहे. कोविड-१९ मदतनिधीसाठी सात कोटी निधी जमवण्याच्या एका मोहिमेत त्यांनी हे दोन कोटींचे योगदान दिले आहे. हे दोघे केट्टो या समुदाय निधी संकलन व्यासपीठाद्वारे हा सात कोटींचा निधी जमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे दोन कोटी रुपये देऊन सुरुवात केली आहे. ‘केट्टो’वर सात दिवस ही निधी संकलन मोहीम चालणार आहे.

त्यानंतर हा निधी एसीटी ग्रांटस यांच्याकडे वळविण्यात येईल. एसीटी ग्रांटसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा, मनुष्यबळ, लसीकरण जनजागृती आणि टेलिमेडिसिन सेवांसाठी मदत करण्यात येणार आहे. विराट कोहलीने म्हटले आहे की, देशाच्या इतिहासात अभूतपूर्व अशा संकटातून आपण जात आहोत. आपण सर्वांनी एकजुटीने काम करून जेवढे प्राण वाचवता येतील तेवढे वाचवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षापासून लोकांचे हाल व पीडा पाहून मी व अनुष्का अतिशय दुःखी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button