विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न

Virat Kohli & Anushka Sharma

नवी दिल्ली :- भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतला महत्त्वाचा सामना ड्रॉ झाला. त्याच वेळी भारतीय कप्तानाच्या घरी मुलीने जन्म घेतला. सोमवारी दुपारीच अनुष्काने मुलीला जन्म दिला. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे विराटने कळवले आहे. आम्हाला जाहीर करण्यात प्रचंड आनंद होतो आहे. आम्हाला मुलगी झाली आहे. आमच्या आयुष्यातले नवे पर्व सुरू झाले आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल आभारी आहे. पण या क्षणी आमचं खासगीपण जपण्याच्या अधिकाराचा आपण सगळे मान राखाल, अशा शब्दांत विराट कोहलीने (Virat Kohli) इंस्टाग्राम पोस्टमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER