धनवान खेळाडूंच्या यादीत विराट कोहली ६६ व्या स्थानी

Virat Kolhi
  • वर्षाला २ कोटी ६० लाख डॉलरची कमाई
  • पैकी २ कोटी ४० लाख फक्त जाहिरांतींमधून

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आजच्या घडीला सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने गेल्या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाºया खेळाडूंच्या यादीत ६६वे स्थान प्राप्त केले आहे. प्रतिष्ठीत अर्थविषयक नियतकालिक फोर्बसने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या यादीत त्याच्या गेल्या १२ महिन्यातील कमाई २ कोटी ६० लाख डॉलर असल्याचे आकलन करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी विराट याच यादीत १०० व्या स्थानी होता तर त्याआधी २०१८ मध्ये तो ८३ व्या स्थानी होता. आतापर्यंत सर्वात धनवान खेळाडूंच्या यादीत त्याने मिळवलेले हे सर्वोत्तम स्थान आहे.

३१ वर्षीय विराटच्या कमाईत अधिक हिस्सा जाहिरातींचा असून या माध्यमातून त्याने २ कोटी ४० लाख डॉलरची कमाई केली आहे तर मानधन किंवा वेतनाच्या माध्यमातीन २० लाख डॉलरची कमाई आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महागड्या वेतनाचा ए प्लस करार केलेल्या तीन क्रिकेटपटू पैकी तो एक आहे.

विराट सध्या उबेर, ऑडी , हिरो, एमआरएफ, प्युमा, गुगल, फ्लिपकार्ट, व्हॉल्वोलीन, कोलगेट पामोलीव्ह अशा ब्रँडस्च्या जाहिराती करतो. कॉर्नरस्टोन ही संस्था त्याच्या मार्केटींगचे काम बघते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER