एलिमिनेटर सामन्यात विराट सलामीला ठरला अपयशी

Virat failed to open the match in the eliminator

विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) पहिले आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले. शुक्रवारी अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून संघाला सहा विकेटने पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आरसीबीचा पराभव झाल्यानंतर लोकांनी विराट कोहलीच्या (Virat kohali) निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले.

वस्तुतः स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहलीने शेवटच्या काही सामन्यात फलंदाजी केली नाही. त्याच्या संघालाही याचा फटका सहन करावा लागला आणि शेवटच्या पाच सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. हे बदलण्यासाठी विराट कोहलीने हैदराबादविरुद्ध एक मोठा निर्णय घेतला आणि या मोसमात प्रथमच सलामीला उतरला. मात्र, हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले नाही आणि सात चेंडूत अवघ्या सहा धावा काढून तो दुसर्‍या षटकात तो बाद झाला आणि पॅव्हिलियनमध्ये परतला.

अ‍ॅलिमिनेटर सामन्याआधी आरसीबीकडून देवदत्त पडीक्कलसह आरोन फिंच आणि जोस फिलिप डावाची सुरुवात करत होते. तथापि, काही सामने वगळता बहुतेक सामन्यांमध्ये फिंच अपयशी ठरला. तसेच, फिलिप देखील मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला.

तसे, विराट कोहलीची सलामीवीर फलंदाजी बद्दल बोलायचे तर आयपीएलमध्ये प्रथमच सलामीला फलंदाजीसाठी आला नव्हता. यापूर्वी तो ६० डावांमध्ये खेळला असून या दरम्यान त्याने केलेली कामगिरीही उत्कृष्ट होती. विराटने ४८.८३ च्या सरासरीने आणि १४०.३९ च्या स्ट्राइक रेटने २३३९ धावा केल्या आहेत. सलामीवीर म्हणून कोहलीने आयपीएलमध्ये पाच शतके आणि १५ अर्धशतकेही केली आहेत.

या मोसमात विराटने शानदार प्रदर्शन केले आहे. एलिमिनेटर सामन्याआधी त्याने १४ डावात ४६.०० च्या सरासरीने आणि १२२.०२ च्या स्ट्राइक रेटने ४६० धावा केल्या. या दरम्यान त्याने २३ चौकार आणि ११ षटकार लगावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER