IPL 2020: श्रेष्ठतेच्या लढाईत विराटने धोनीवर केली मात, बंगळुरूने चेन्नईला ३७ धावांनी केले पराभूत

Bangalore beat Chennai by 37 runs

इंडियन प्रीमियर लीग च्या २५ व्या सामना विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विरुद्ध महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात विराट सेनेने धोनीच्या शेरांना ३७ धावांनी पराभूत करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध निर्धारित २० षटकांत चार बाद १६९ धावा केल्या. विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद ९० धावा केल्या. त्याच्यासाठी सलामीवीर देवदत्त पाडिक्क्कलने ३३ धावा आणि शिवम दुबेने नाबाद २२ धावा केल्या. आरसीबीच्या १७० धावांच्या उद्दिष्टाला उत्तर देताना चेन्नई सुपर किंग्सची टीम निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३२ धावा करू शकली. बंगळुरूकडून वेगवान गोलंदाज क्रिस मौरिसने चार षटकात १९ धावांत तीन गडी बाद केले आणि फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने तीन षटकात १६ धावा देऊन दोन बळी घेतले.

१७० धावांच्या लक्ष्याच्या उत्तरात चेन्नई सुपर किंग्जचा डाव १३२ धावांवर संपुष्टात आला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १७० धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १३२ धावा करू शकला आणि सामना ३७ धावांनी गमावला.

दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन:
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: देवदत्त पड्डीकल, आरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), गुरकीरत मान सिंह, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, इशुरू उडाना, क्रिस मौरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.

चेन्नई सुपर किंग्स: शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), सैम करन, एन जगदीशन, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER