Corona Virus : “सावधान राहा, सतर्क राहा”; विराट-अनुष्काचा ‘जनता कर्फ्यू’ला पाठिंबा

Virat-Anushka's support for Janata Curfew

मुंबई : जगभरता कोरोनाची दहशत आहे . भारतासारख्या १३० कोटींच्या, विकासाकडे वेगाने धाव घेणाऱ्या देशाला बेफिकीर राहता येणार नाही. या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काही संकल्प करण्याची गरज आहे. त्यानुसार रविवारी २२ मार्चला लोकांनी स्वत:च्या घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्कानेही मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. “सावधान राहा, सतर्कता बाळगा. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि फैलाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. भारताचे नागरिक म्हणून जबाबदारीने वागा. पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेले सुरक्षिततेचे उपाय पाळा आणि करोनाशी दोन हात करा”, असा संदेश या दोघांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला दिला आहे.