Viral Video : वादळापासून वाचण्यासाठी शेड पकडून उभा होता अन स्वतःच उडाला

Stood holding the shed to escape the storm

निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारनंतर महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याजवळ धडक दिली. २० किमी प्रतितास वेगाने प्रवास करत, वाऱ्यांच्या वेगासह १००-१३० किमी प्रतितास तासाच्या वेगाने हे एक तीव्र चक्रीय वादळ म्हणून बघितल्या गेले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही व्हिडिओ वादळाच्या तीव्रतेची झलक देत आहे, ज्यात वारा वाहणारे, झाडे पडणारी आणि मुसळधार पाऊस दिसत आहे. यातच #NisargaCyclone या hashtag नी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तरी त्यामागील सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही.

मेजर सौरभ शर्मा (निवृत्त) यांनी ट्विटवरुन हा व्हिडिओ निसर्ग वादळाच्या काळातील असल्याचे सांगत ट्विट केलं आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी व्हिडिओतील व्यक्तीचा उल्लेख स्पायडरमॅन असा केला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी सर्व लोक सुरक्षित राहा अशीही प्रार्थना केली आहे.

हा व्हिडिओ जुना आहे की नवीन हे सत्यापित केलेल नाही परंतु सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगवर चालू आहे.