वीरपुत्र अभिनंदन वर्धमान वीरचक्राने सन्मानित होणार

Abhinandan

नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना उद्या म्हणजेच स्वातंत्र्यदिनी वीरचक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरोधात निकराचा लढा देत दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-१६ या लढाऊ विमानाचा वेध घेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-२१ विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलं होतं. त्यामुळे अभिनंदन यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.