लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलन : आरोपी अभिनेता दीप सिद्धूला अटक

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) कृषी कायद्यांविरोधात २६ जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. दीप सिद्धूवर दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला (Deep Sidhu) अटक केली आहे. त्याच्यावर, लाल किल्ल्यावर धर्माचा झेंडा फडकवणे आणि शेतकऱ्यांना भडकवणे असे आरोप आहेत.

२६ जानेवारीपासून फरार

दीप सिद्धू २६ जानेवारीपासून फरार होता. किल्ल्यावर झेंडा फडकवणारे गँगस्टर लक्खा सिधाना आणि जुगराज अजून बेपत्ता आहेत. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) हिंसाचार करणाऱ्या सुमारे ५० जणांचे फोटोही जारी केले आहेत.

लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणे आणि हिंसाचार करण्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करते आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला होता. निदर्शकांनी लाल किल्ल्यात घुसून तेथे ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER