अमेरिकेतील हिंसाचार; १४०० निदर्शकांना अटक

after-death-of-george-floyd-violence-in-america-1400

वॉशिंग्टन : जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशीय नागरिकाचा मिनियापोलिस येथे पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अनेक शहरात हिंसक निदर्शने झाली. १७ शहरातून १४०० पेक्षा जास्त निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. जॉर्जच्या मृत्यूचा व्हीडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहेत.

जॉर्जच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. तरीही आंदोलने सुरूच आहेत. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे तर काही ठिकाणी हिंसक पद्धतीने विरोध सुरू आहेत.

अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची संख्या १४०० पेक्षा सुद्धा जास्त असू शकते. शनिवारी रात्रीही आंदोलने झालीत. पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. फ्लॉयड यांच्या ‘कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसं आहेत’ असे ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याला वांशिक भेदभावाचीही किनार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER