मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार; १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh Violence) होते. दौऱ्यावरून परत येताच काही कट्टर पंथीय मुस्लिम संघटनांनी तेथे आंदोलन केले. त्या ठिकाणी एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. या आंदोलनाला चांगलेच हिंसक वळण लागले आहे. यात आतापर्यंत १० जणांचा (10 killed) मृत्यू झाला, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

बांगलादेशच्या ५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारोहात प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. मोदींनी  बांगलादेशच्या  पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे जवळपास १.२ मिलियन कोरोना व्हॅक्सिन (Corona vaccine) सोपवल्या. भारत आणि  बांगलादेशात पाच  महत्त्वाचे करारही झाले आहेत.

एका कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या सदस्यांनी पूर्व  बांगलादेशमधील हिंदू मंदिरांवर आणि एका रेल्वेवर हल्ला केला. तर अनेक सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली. मोदी यांच्या  बांगलादेश दौऱ्याविरोधात या मुस्लिम संघटनेने हा हिंसाचार घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत १० आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाक्‍यातही निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबराच्या गोळ्याही चालवल्या. या आंदोलनात बरेच जण जखमी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button